Dailyhunt
मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या.

मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या.

मुंबई : मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ममता कदम (वय २३) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती अंधेरी येथील रहिवाशी होती. पोलिसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

मरीन ड्राईव्ह येथे आज (सोमवार) एक युवती बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस व अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाने समुद्रातून युवतीला बाहेर काढून मुंबईतील जी.टी.रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यावेळी आत्महत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी तपासही सुरू केला होता.

युवतीने समुद्रात उडी मारण्यापूर्वी चौपाटीवर तिची बॅग सोडली होती. त्यातील ओळख पत्रावरून युवतीचे नाव ममता प्रवीण कदम (वय 23) असल्याचे पोलिसांना समजले. ममता ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीत कामाला होती. सकाळी कामावर जात असल्याचे सांगून ती घरातून बाहेर पडली. मात्र, ती कामावर गेलीच नाही, तिने थेट मरीन ड्राईव्ह परिसर गाठले. यावेळी, इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल समोरील चौपाटीवर ती समुद्रात उतरली होती आणि तिथेच तिचा बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी सकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास युवतीला पाण्यातून बाहेर काढले. युवतीचा मोबाईल पोलिसांना मोबाईल सापडला असून त्यातील व्हॉट्सअॅप चॅटींगवरून वैयक्तिक कारणास्तव तिने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…

आत्महत्या केलेल्या बापलेकाच्या घराची पोलिसांकडून झडती; एका चिठ्ठीने वाढवलं गूढ…

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka