Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्.

पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्.

त्रपती संभाजीनगर : वाळुजमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या व्यापाऱ्याचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे आणि एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका अज्ञात व्यक्तीने व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांच्यावर 17 मार्चच्या रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान गोळीबार केला होता. वाळूज परिसरातील साजापूर शिवारात डोक्यात बंदुकीची गोळी झाडून त्यांचा खून केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गुन्हे शाखा आणि वाळूज पोलिस असे पाच पथके आरोपीचा शोध घेत होते.

गुन्ह्याचा शोध करत असताना गुन्हे शाखेच्या एका पथकाला त्यामध्ये यश आले आहे. हा खून ग्रामीण पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसाने केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यासोबत एक साथीदार सुद्धा सोबतीला होता. विशेष म्हणजे हा रामेश्वर सिताराम काळे हेडकॉन्स्टेबल लाच लूजपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईमध्ये निलंबित करण्यात आला होता. तर त्याच्यावर 354 प्रमाणे छेडछाडीचा गुन्हा देखील ग्रामीण पोलिस दलात दाखल झालेला आहे.

आरोपी पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर सिताराम काळे आणि लक्ष्मण जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे याला मृत व्यापारी सचिन नरोडे याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मागील दोन महिन्यापासून आरोपी काळे हा मृत व्यापाऱ्याच्या मागावर होता. रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज नव्हती. त्याचा फायदा घेऊन आरोपीने व्यापाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली होती.

पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…

नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka