मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस व भरारी पथकांकडून ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. नालासोपारा येथे साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे.
एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये आहेत, परंतु या रकमेचा नेमका हिशोब सादर करण्यात अपयश आल्याने पोलिसांना संशय आला आहे. संबंधित रक्कम एटीएमसाठी होती, की निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार होती. सदर प्रकरणावर पुढील तपास सुरू आहे. व्हॅनमधील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी व्हॅनमधील बॅगांमध्ये असलेली रक्कम जप्त केली आहे. तर विरारच्या मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी 80 लाख एवढी रोख रक्कम कॅश व्हॅनमध्ये सापडली आहे. निवडणूकांच्या आचारसंहितेचा कॅश संदर्भात असलेली नियमावली पाळत नसल्याने, पोलिसांनी कॅश व्हॅन ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातही पोलिसांनी 40 लाख रुपयांची रोकड पकडली आहे. निवडणूक भरारी पथकाने ही 40 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे.
पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…
पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…
पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…
पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश; पाहा 58 नावे…
संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…
The post पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

