पुणे (संदिप कद्रे): राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी दोन कारवायांमध्ये मोठी रक्कम ताब्यात घेतली आहे.
पुणे शहरातील सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटी रुपयांचे सोने पकडले आहे. सातारा रस्त्यावर आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत पुढील तपासणी सुरू आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता, त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचे सोने असल्याची माहिती समोर आली आहे.
सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोने पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होते, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणला असून, पुढील तपास सुरू आहे.
टेम्पोमध्ये पांढरे बॉक्स होते. या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच चालकाकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये दागिने असून मुंबईतून ते पुण्याच्या कार्यालयात आणले आहेत. त्यामुळे, आपण आयकर विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुढील चौकशीसाठी त्यांनाही बोलवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…
पुणे शहरात जबरी चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक…
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…
मनोधैर्य योजना! 'बोपदेव घाट' प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…
The post पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

