Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग.

प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग.

भंडारा: भंडारा शहरातील शासकीय बीएड महाविद्यालयात कार्यरत असेलया एका प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला प्राध्यापकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

14 मार्चला दुपारी महाविद्यालयाच्या स्टाफची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः दिली असल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विदर्भातील एकमेव शासकीय बीएड महाविद्यालय भंडारा शहरात आहे. या महाविद्यालयात कार्यरत महिला सहायक प्राध्यापिकेचे पती हे मिझोराम येथे लष्करात देश सेवा करीत आहे. पीडित महिला प्राध्यापिका या त्यांच्या एका मुलीसह भंडाऱ्यात राहतात. 14 मार्चच्या दुपारी महाविद्यालयाच्या स्टॉपची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः पत्रकार परिषदेत सांगितली आहे.

प्राध्यापकाने पीडित महिला प्राध्यापिकेच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. प्राध्यापकाच्या अचानक अशा वागण्याने पीडित महिला भांबावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलिस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या भंडारा पोलिस करीत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकांवर केला प्राणघातक हल्ला…

पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला 'I Love You' चा मेसेज अन्…

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

The post प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka