Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप.

प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप.

खनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने विषारी द्रवपदार्थ पिवून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना कानपूर येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

अनेक वर्षं प्रेमबंधनात राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी आपापली घरं सोडून पनकी भागातील घरात आपला नवा संसार थाटला होता. आता दोघांनी जीवन संपवल्याचं कळल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरमधील नौबस्ता भागात राहणारी सलोनी आणि अल्केश सचान या दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं. पण त्यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता.

दोघांनीही कुटुंबीयांचा विरोध झुगारून पाच वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. त्यानंतर ते पनकील्या पतरसा या गावामध्ये घर भाड्याने घेऊन राहत होते. रविवारी रात्री या जोडप्याने विष खाल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामागचं कारण लवकरच शोधले जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

घटनास्थळी कुठलीही चिठ्ठी आढळलेली नाही, त्यामुळे या दोघांनी स्वतः विष प्यायलं की दुसऱ्या कोणी त्यांना विष दिलं? हे स्पष्ट होत नाही, असे पोलिसांचे मत आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी 'निर्भया'ला मिळाला न्याय…

लेकीचे लग्न चार दिवसांवर असतानाच बापाने तोंडात गोळ्या घालून केली हत्या…

धक्कादायक! भावाने घरात प्रवेश केला अन् दिसले पाच जणांचे मृतदेह…

The post प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka