Dailyhunt
सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं.

सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं.

ळगाव: पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने वार करत जावयाला ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १९) पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

जावयावर वार करताना मध्ये पडलेल्या जावयाच्या कुटुंबातील 7 जणांवरही वार करत जखमी केले आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या भावासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. मुकेश रमेश शिरसाठ असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून प्रेमविवाहाचा बदलातून झालेल्या हत्याकांडाने खळबळ मजली आहे. परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुकेश रमेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी पूजा नावाच्या युवतीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने मुकेशच्या मानेवर वार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले असून यात कुटुंबातील 7 जण जखमी झाले आहेत. मुकेशच्या पाठीमागे आई-वडील, भाऊ पत्नी व मुलगी आहे.

दरम्यान, युवकाच्या हत्याकांडाने जळगाव परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या तीव्रतेने परिसरात तणाव निर्माण झाला असून, पिंपराळा हुडको परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…

बापरे! सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला साताजन्माची शिक्षा…

'सैराट'ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…

सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

The post सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka