Dailyhunt
प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड.

प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड.

पुणे (संदिप कद्रे): नाशिक शहरामध्ये अल्पवयीन मुलाचा खुन करून अपघाताचा बनाव केलेला खुनाचा गुन्हा उघड करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०२/०९/२०२४ रोजी बिबवेवाडी पोलिस ठाणे, कमला नेहरू हॉस्पिटल कसबापेठ पुणे यांनी खबर दिली की, महिला पल्लवी विरभद्र काळे (वय २४, रा.

राजीव गांधी नगर अप्पर बिबवेवाडी पुणे) यांनी कळविले की, पेशंट वेदांश विरभद्र काळे (वय ०४ वर्षे, रा. सदर) हे सकाळी ०६/०० वा. राहते घरात कॉटवरून पडला. आई घरी नव्हती. आई सकाळी ०८/०० वा. सुमारास कामावरून घरी आल्यावर पाहिले असता पेशंट बेशुध्द होता व डोक्याला मार लागला होता. १५ दिवसापुर्वी लोणावळा पुणे येथे टेरेसवरून पडल्यामुळे उपचार केले होते व हाताला प्लॅस्टर आहे. पुढील उपचारकामी कमला नेहरू हॉस्पिटल कसबा पेठ पुणे येथे दि. ०२/०९/२०२४ रोजी सकाळी ०९/४३ वा. आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना ०९/५३ वा. उपचारापुर्वी मयत घोषीत केले. त्याचा एम. एल. सी. नं २१ / २०२४ असा आहे.

सदर मुलाचे पोस्टमार्टम झाले नंतर त्यास "Multiple Injuries" ने मरण आल्याचे डॉक्टांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशांक जाधव व पोलिस अमंलदार विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे व महिला पोलिस अमंलदार आदिती बहिरट यांनी सदर मुलाचे आईकडे चौकशी करीत असताना ती उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर महिला अप्पर बिबवेवाडी पुणे येथे तिन महिन्यापासून राहत नसल्याची माहिती प्राप्त झालेने सदर बाबत संशय निर्माण झाला. तिचे नातेवाईक व तिचेकडे अधिक चौकशी करता सदर महिला पल्लवी काळे हिचे काही महिन्यापासून आरोपी महेश कुंभार (रा. पंचवटील नाशिक) याचेशी प्रेमसंबंध होते. सुमारे तीन महिन्यापासून ती अप्पर बिबवेवाडी पुणे येथून तिचे मुलांसह महेश कुंभार याचेबरोबर कृष्णानगर पंचवटी नाशिक येथे राहणेस गेली.

सदर ठिकाणी दिनांक ०१/०९/२०२४ रोजी रात्रौ ११.०० वा. सदर महिलेचा मुलगा वेदांश (वय ०४) हा जेवल्यानंतर उलटी केल्यामुळे त्याचा राग येवून आरोपी महेश कुंभार यांने मुलगा वेदांश यास हाताने व झाडूने मारहाण केली. त्यामुळे तो बेशुध्द पडलेने त्यास प्रथम नाशिक येथील सिव्हील हॉस्पीटल घेवून गेले व त्यानंतर तेथून त्यास सदर महिलेने व आरोपी महेश कुंभार यांनी कमला नेहरू हॉस्पीटल पुणे येथे आणले असता हॉस्पीटल यांनी दिलेल्या खबरी वरून पुढील तपास केला असता मारहाणी मुळे मृत्यू झालेचे निष्पन्न झाले. झिरो नंबर ने खुनाचा गुन्हा नोंद करून तो पंचवटी केला आहे. आरोपी महेश कुंभार यांचा तांत्रिक विश्लेषण व पोलिस उप निरीक्षक अशोक येवले यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळालेवरून सदर आरोपी हा नाशिक येथे असल्याचे माहिती पंचवटी पोलिसांना दिल्याने सदर आरोपीस पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे, पोलिस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, तपास अधिकारी पोलिस पोलिस उप निरीक्षक श्री शशांक जाधव, पोलिस उप निरीक्षक अशोक येवले, पोलिस उप निरीक्षक विवेक सिसाळ, पोलिस अमंलदार विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे, विशाल जाधव, संजय आग्रे, अजय कामठे व महिला पोलिस अमंलदार आदिती बहिरट यांनी यांनी केली आहे.

The post प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka