लखनौ (उत्तर प्रदेश) : एक प्रियकर रात्रीच्या वेळी त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. अंधारात चुकून प्रेयसीच्या जावेच्या पांघुरणात घुसला आणि पकडला गेला. कुटुंबीयांनी प्रियकराला बेदम मारहाण केली.
बदायूँ येथे ही घटना घडली आहे. प्रियकर मध्यरात्रीच्या सुमारास चुकून प्रेयसीच्या जावेच्या पांघुरणात घुसला आणि तिच्याशी छेडछाड करू लागला. महिलेने आरडाओरडा सुरू केली. तिचा आवाज ऐकून कुटुंबातील सर्व लोक जागे झाले. त्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्यावेळी तो तिथून फरार झाला; पण सहा दिवसांनंतर तो त्याच्या विवाहित प्रेयसीला घेऊन पळून गेला. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
उघैती पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले, ‘एका युवकाचे आमच्या थोरल्या सुनेशी गेल्या दोन वर्षांपासून संबंध होते. तो अनेकदा तिला भेटायला घरी येत असे आणि आम्ही त्याला पकडलं देखील होते. पण पोलिसांनी एकदाही कारवाई केली नाही. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. 5 नोव्हेंबरला रात्री सुमारे दीड वाजता तो परत आमच्या सुनेला भेटण्यासाठी टेरेसावरून घरात शिरला; पण चुकून तो आमच्या धाकट्या सुनेच्या बेडवर जाऊन झोपला. त्याने अंधाराचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यामुळे तो रंगेहाथ सापडला.
विवाहित महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानुसार, ‘आरोपीने पिकअपने धडक देऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी याबाबत पोलिसांना सांगितलं; पण कोणतीही कारवाई झाली नाही. आता तो माझ्या पत्नीला घेऊन पळून गेला आहे. पोलिसांनी विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला; पण जीवे मारण्याचा प्रयत्न आणि महिलेला पळवून नेल्याची नोंद झाली नाही.’
पोलिसांनी सांगितले की, ‘युवकाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. आम्ही प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. जशी तक्रार दिली आहे, तसा एफआयआरही नोंदवला आहे. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत.’
एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…
मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…
नवरा कामाला गेला की प्रियकराला घरी बोलवायची; एक दिवस…
Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…
The post प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

