बंगळूरू (कर्नाटक): प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणामधून विष देऊ लागली. रुग्णालयातून मरनावस्थेतून पती घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. नवऱ्याचा खून करायचाच हे तिने ठरवले. प्रियकराला घरी बोलावून घेतलं आणि दोघांनी मिळून उशीने गळा दाबून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उडुपी येथे घडली आहे.
उडपी जिल्ह्याच्या करकला तालुक्यातल्या अजेकर या गावात एक धक्कादायक घटना घडली. बाळकृष्ण पुजारी आणि प्रतिमा यांचे 17 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. ते मुंबईत राहत होते. कोरोनामध्ये बाळकृष्ण कर्नाटकात आले. तिथे ते एका महाविद्यालयात कॅन्टीन चालवत होते. प्रतिमा ही ब्युटी पार्लर चालवत होती. तिला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचा नाद होता. त्यातच तिची ओळख करकला येथील व्यावसायिक दिलीप हेगडे याच्याशी झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.
दोघांच्या प्रेमाबद्दल गावच्या लोकांनाही समजले. त्यांनी बाळकृष्णच्या कानावर ही गोष्ट घातली, तेव्हा त्यानं बायकोला समज दिली. एक-दोन वेळा त्यांचे वाद पोलिस ठाण्यापर्यंतही गेले. कुटुंबीयांनी समजावल्यावर आणि पोलिसांनी समज दिल्यावर दोघंही शांत झाले होते. प्रियकरासाठी तिने नवऱ्याला मारण्याचा कट रचला. ती रोज त्याच्या जेवणात थोडं विष कालवायची. थोडं थोडं विष घालून त्याला आजारी पाडून मारण्याचा तिचा डाव होता, म्हणजे कोणाला संशयही आला नसता. महिनाभर विषयुक्त अन्न खाल्ल्यामुळे बाळकृष्ण आजारी पडला. किडनी आणि यकृतावर परिणाम झाला. कुटुंबियांनी कावीळ झाली असेल म्हणून रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. बाळकृष्णची प्रकृती सुधारूही लागली. त्यामुळे पत्नी नाराज झाली. नवऱ्याला बरं वाटल्यावर घरी आणले. मात्र, त्याचा जीव घेण्याचा तिने पुन्हा कट रचला.
एक दिवशी बाळकृष्ण याने आईच्या हातचं जेवण घेतले. त्यानंतर पती-पत्नी झोपायला खोलीत गेले. पत्नीनं प्रियकराला बोलावून घेतले आणि दोघांनी मिळून उशीने गळा दाबून त्याची हत्या केली. बाळकृष्णचा मृत्यू झाल्याचे तिने सकाळी उठून घरच्यांना सांगितले. मात्र पोलिसांपासून ती स्वतःचे गुन्हे लपवू शकली नाही. पोलिस चौकशीत तिने गुन्हे कबूल केले. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…
पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…
धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
The post खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

