Dailyhunt
पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम.

पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम.

पुणे: भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्ये करायला लावणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सुस भागात मठ असलेल्या प्रसाद बाबाने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आणखी पंधरा युवक समोर आले आहेत.

यामुळे या समलैंगिक भोंदूबाबाचे खरे रूप समोर आले आहे.

इंस्टाग्रामवर या बाबाचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. दिवसेंदिवस त्याच्या भक्तांच्या संखेत वाढ होत चालली होती. पुरुष भक्ताचे अंग चोळून त्याला अंघोळ घालणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदारच प्रस्थ गेल्या काही वर्षांत पुणे आणि परिसरात वाढले होते.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

प्रसादचे वडील भीमराव दातीरने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षांपूर्वी सुरु केला आहे. सी ए पर्यंतच शिक्षण झाल्याचा दावा करणाऱ्या प्रसादने 2022 मध्ये स्वतः या मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला. भक्तांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत, हा त्याचा उद्देश होता. प्रसाद बाबा त्याच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा. ग्रहदोष असल्याने सांगून मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करावे लागेल असे कारण तो द्यायचा. मात्र ते ॲप डाउनलोड करताना तो आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा. पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल एक्टिव्हीटीवर नजर ठेवता यावी यासाठी या एअर ड्रॉइड कीड या एपची निर्मिती करण्यात आली आहे. या एपमुळे भक्ताच्या संपूर्ण मोबाईलचा एक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा. भक्ताच्या मोबाईलमधील कॅमेरातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा. कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि आज आपण कुठे कुठे गेलो होतो हे सर्व प्रसाद बाबाला दिव्य साक्षात्कार झाला असल्याने समजल्याचे भक्तांना वाटायचे आणि त्यांचा प्रसाद बाबावरचा विश्वास आणखीनच दृढ व्हायचा.

प्रसाद बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलग दोन दिवस केवळ तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर त्या भक्ताला या मठात बोलावून पुढच्या अघोरी विद्येच्या क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा. सलग दोन दिवस झोप न मिळाल्याने तो भक्त झोपी गेला की प्रसाद बाबा त्याच्यासोबत लैंगिक चाळे सुरु करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे, असे सांगत त्या भक्ताला लैंगिक संबंध ठेवायला भाग पडायचा.

एका बांधकाम व्यवसायिकाचे प्रसाद बाबाने असेच लैंगिक शोषण केले होते. प्रसाद बाबाने त्या बांधकाम व्यवसायिकाच्या मेहुण्यासोबत करण्याचा प्रयत्न केला असता एअर ड्रॉयर ॲपमुळे त्या मेहुण्याच्या मोबाईलमधील मेमरी फुल झाल्याचे नोटिफिकेशन आले आणि बाबाच बिंग फुटले. त्यानंतर या बांधकाम व्यवसायिकाने आणि त्याच्या मेहुण्याने पोलिसांकडे तक्रार दिली आणि पोलिसांनी प्रसाद बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून शोषण झालेल्या पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अशा पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…

भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

The post पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka