Dailyhunt
पुणे! दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल.

पुणे! दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल.

पुणे: राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 कोटीच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपर वापरल्याने, स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करुन बनावट दस्त बनवून हा दस्त खरा असल्याचे भासवून फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून 50 लाख रुपये घेतले. समर्थ पोलिस ठाण्यात याप्रकरणी शंतनु कुकडे, करण मानकर यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या 5 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला तो बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! 'माझे कर्तव्य, माझे कुटुंब'

समर्थ पोलिसांत रेड हाऊस फाऊंडेशनचा शंतनु कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराप्रकरणी पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदला गेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे व रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी चौकशी सुरू केली असता दिपक मानकर, करण दिपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता. पोलिसांनी करण व सुखेन शहा याच्याकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली. तेव्हा करण मानकर याने त्यांच्या जबाबात सांगितले की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनु हा करण याला पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील 40 वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने 500 रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला. पोलिसांनी तपासादरम्यान हे दस्त बनावट तयार केल्याचे समोर आले असून, जो दस्त क्रमांक करण यांनी पोलिसांना दिला, तो दस्त क्रमांक एका वेगळ्याच व्यक्तीने नियमानुसार खरेदी केला असल्याचे समोर आले. यामुळे आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन शहा, करण मानकर, रौनक भरत जैन यांच्यासह इतरांवर बनावट दस्त तयार करणे, त्याद्वारे आर्थिक व्यवहार दाखवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शंतनू कुकडे, जो एका परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी आहे, त्याच्याशी मानकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. कुकडेच्या बँक खात्यात तब्बल 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, यातील काही रक्कम ही मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात वर्ग झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! दिपक मानकर यांनी केली पोलिसांची दिशाभूल; गुन्हा दाखल…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…

मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

The post पुणे! दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka