Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट.

पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट.

पुणे: पुणे शहरातील हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुरुवातीला शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र यानंतर हे जळीतकांड बसचालकानेच घडवून आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी चालक जनार्दन हुंबर्डीकर (वय ५७) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

बसचालकावर जळीतकांडाचा आरोप होत असताना, या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. जनार्दन हुंबर्डीकर याला नाहक गोवले जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने केला आहे. त्यांनी पोलिसांच्या तपासावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. हुंबर्डीकर पूर्णपणे शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब कसा नोंदवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवाय, ज्या बसला आग लागली, त्यात बस चालक जनार्दन याचे सख्खे भाऊजी देखील होते, असे असताना जनार्दनने रिस्क कशी घेतली? असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना जनार्दन हुंबर्डीकरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जनार्दन हुंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाच कसा? ज्या बसला आग लागली, त्यामध्ये जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते. त्यामुळे ते आग कशी लावतील?

तसेच घटनेत वाचल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही, त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावली असेल, तर त्यासाठी वापरलेले केमिकल आणताना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत हुंबर्डीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने घेतले धक्कादायक वळण…

पिंपरी-चिंचवड पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये रंगला चकमकीचा थरार; गोळीबारात दरोडेखोर जखमी…

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…

पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…

पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 5 जणांचा मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, 5 जण होरपळले…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka