Dailyhunt
पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे.

पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून, अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर बुधवारी (ता. १८) रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघात एवढा भीषण होता की 7 जण ठार झाले असून, 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच 42 ए एक्स 1060) जेजुरीकडून मोरगावकडे जात होती. श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला ( क्र. एम एच 12 एक्स एम 3694 ) जोरदार धडक दिली. एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराममध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत असून त्यावरुन, भीषण अपघाताची दाहकता लक्षात येईल.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…

  1. सोमनाथ रामचंद्र बायसे (21),
  2. रामू संजीवन यादव, दोघेही रा नाझरेकप ता.पुरंदर जि.पुणे,
  3. अजयकुमार चव्हाण, रा. उत्तर प्रदेश,
  4. अजित अशोक जाधव, रा.कांजळे, ता. भोर, पुणे,
  5. किरण भारत राऊत रा. पवारबाकी ता. इंदापूर, पुणे,
  6. अश्विनी संतोष येसार, रा. नागणसूर हैद्रे सोलापूर,
  7. अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी ता. बारामती, पुणे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मृतांचे पार्थिक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची 'कठोर' शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू…

हृदयद्रावक! इंद्रायणी अपघातात 'फादर्स डे'लाच वडील आणि मुलाने गमावला जीव…

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

The post पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka