सोलापूर : अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाले आहेत.
भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? वॉटरपार्कमधल्या राईडची डागडुजी केली होती का? याचा तपास पोलिस करत आहेत.
अकलूजच्या सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये घडलेल्या या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सयाजी राजे वॉटर पार्क हा जयसिंहराजे मोहिते पाटील यांच्या मालकीचा आहे. जयसिंहराजे मोहिते पाटील यांनी त्यांचा नातू सयाजीला वाढदिवसानिमित्त हा वॉटर पार्क गिफ्टमध्ये दिला होता.
पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थ्याला झोपेतच शॉक देऊन संपवलं…
हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू…
धक्कादायक! गावातील युवतीसोबत प्रेमविवाह अन् ऑनलाईन रम्मीचा लागला नाद…
हृदयद्रावक! इंद्रायणी अपघातात 'फादर्स डे'लाच वडील आणि मुलाने गमावला जीव…
The post Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

