Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात अनैतिक संबंधातून महिलेची क्रूरपणे हत्या.

पुणे जिल्ह्यात अनैतिक संबंधातून महिलेची क्रूरपणे हत्या.

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरोली (शिंदेवस्ती, ता. खेड) येथे अनैतिक प्रेमसंबंधातून विवाहित महिलेची क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे.

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

रूपाली विलास वाडेकर (वय ४६, रा. कल्याण, जि. ठाणे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मूळची ठाण्याची असलेली रूपाली काही दिवसांपासून शिरोली येथील आरोपीच्या घरी वास्तव्यास होती. आरोपी ललित दिपक खोल्लम (वय ३७, रा. शिंदेवस्ती, शिरोली, ता. खेड) याच्याशी तिचे अनैतिक संबंध होते.

शिरोली येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ललितच्या फ्लॅटमध्ये दाम्पत्यात उशिरापर्यंत भांडण झाल्याचे शेजाऱ्यांना ऐकू आले. त्यानंतर साधारण ११.२० च्या सुमारास रूपालीचा रक्ताने माखलेला मृतदेह आतमध्ये आढळला. तिचा गळा धारदार हत्याराने चिरल्याचे दिसून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस हवालदार सुदर्शन सुखदेव माताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ललित खोल्लम याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलिसांकडून जोरदार शोध सुरू आहे.

दरम्यान, ललित याने यापूर्वीही एका प्रकरणात तुरुंगवास भोगलेला असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचे प्रेमसंबंध ठाण्यात असताना जुळले होते. रूपालीच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती नातेवाईकांकडे राहत होती आणि काही काळापूर्वी शिरोली येथे आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू…

पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…

पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…

पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka