Dailyhunt
पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात.

पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात.

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता.आंबेगाव जि. पुणे) येथील नंदिनी बियर बारच्या आवारात शनिवारी (ता. २) रात्री नऊ वाजता धारदार शस्त्राने प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५ राहणार गांजाळे मळा, मंचर ता.आंबेगाव) यांचा खून झाला आहे.

सदरची घटना पैशाच्या व्यवहारातून झाली असल्याची चर्चा असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतीक शिवाजी इंदोरे (सर्व राहणार चांदोली खुर्द ता. आंबेगाव) यांनी प्रशांत गांजाळे याला नंदिनी बियर बार जवळ बोलावले होते. नंदिनी बियर बारच्या दरवाजामध्ये त्यांचा वाद सुरू झाला. वाद विकोपाला जाऊन शहाजी वामन इंदोरे यांचे साथीदार सचिन सुदाम इंदोरे व प्रतिक शिवाजी इंदोरे यांनी प्रशांत रवींद्र इंदोरे याला धरले व शहाजी वामन इंदोरे यांनी धारदार शास्त्राने प्रशांत रवींद्र यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. व सदरचे तिन्ही आरोपी पळून गेले. स्थानिकांनी प्रशांत याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मंचर पोलिसांना घटना घडल्याचे कळताच घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी एक तासाच्या आत शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे व प्रतिक शिवाजी इंदोरे (सर्व राहणार चांडोली खुर्द ता. आंबेगाव) यांना अवसरी खुर्द येथून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडगे व पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शना सहा. पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत यादव, सहा. पोलिस निरीक्षक राजेश नलावडे, सहा. पोलिस निरीक्षक गणपत डावकर, पोलिस हवालदार सुदाम घोडे, पोलिस हवालदार हगवणे, पोलिस अंमलदार योगेश रोडे, अविनाश दळवी, हनुमंत ढोबळे यांनी कारवाई केली. वरील तिन्ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्…

पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक…

पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

The post पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka