Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून.

पुणे जिल्ह्यात मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून.

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

सौरभ संजय देठे (रा. मंचर, सिद्धार्थ नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील संभाजी महाराज चौक सिद्धार्थनगर येथे १९/३/२०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सौरभ संजय देठे (रा. मंचर, सिद्धार्थ नगर) याचा त्याचा मोठा भाऊ रोहित संजय देठे याने त्याची पत्नी नंदिनी रोहित देठे ही कपडे धुवत होती. यावेळी सौरभ देठे याच्या कडून तिच्या अंगावर पाणी सांडल्याचा राग धरून शिवीगाळ व दमदाटी करून हातातील चाकूने अंगावर जागोजागी वार करून ठार मारले. अशा आशयाची फिर्याद दोन्ही भावांचा आत्या भाऊ स्वप्निल काळुराम जाधव (वय २६, रा. मंचर) याने मंचर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक बडगुजर करत आहेत.

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक…

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka