Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप.

पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप.

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीने राज्याच्या सचिवांना पत्र लिहून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये युवतीने आरोपी दत्ता गाडे याने माझ्यावर दोनवेळा बलात्कार केला.

तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचे होते, मात्र आपण विरोध केल्याने तो पळून गेला. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली. शिवाय, पुरुष पोलीस अधिकारी देखील आपल्याकडे चौकशी करत होते, असे या युवतीने म्हटले आहे.

आपल्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी वक्तव्ये आरोपीच्या बाजुने आणि काही राजकिय नेत्यांनी केली. आपली बदनामी थांबवण्यात यावी आणि अशा वक्तव्यांवर बंदी घालण्याची मागणी आपण पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, दाद मिळाली नाही. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय मिसर यांच्याबद्दल आपल्याला आत्ताच आक्षेप घ्यायचा नाही. मात्र त्यांच्यावर आक्षेप घेता येईल अशी माहिती आपल्याकडेच उपलब्ध आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी तिने केली आहे.

पत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे…
1) पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी इच्छा नसताना माझी संमती घ्यायची व स्वतः माझी वैद्यकीय चाचणी करायची
2) अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मी माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगायचे
3) आरोपी दत्ता गाडे याने दोनदा माझ्यावर बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा त्याने जबरदस्तीचा प्रयत्न केला
4) तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला होता, कदाचित दोनदा लैंगिक अत्याचार केल्याने त्याने सुद्धा माघार घेतली आणि तो पळून गेला
5) पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले होते की तुला तीन वकिलांचे नावे आम्ही सुचवू आणि त्यातून तुझ्या पसंतीचे वकील आम्ही नेमू
6) मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता, तुला यायला एक दिवस उशीर झाला असे पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले, म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का?
7) मला अजय मिसार यांच्या बद्दल आत्ताच आक्षेप घ्यायचे नाहीत, पण मी माहितीशास्त्र अभ्यासक्रम केला असल्याने माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की आपल्याला सांगू इच्छिते
8) घटनेच्यावेळी मी आरडाओरडा केला त्यानंतर माझा आवाज खोल गेला, आवाजच निघत नव्हता व त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने जखमी झालेल्या मुली मारून टाकण्यात आलेल्या गोष्टी आल्या मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले.

स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात…

स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…

आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…

पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन…

पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…

स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka