Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात.

पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात.

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात मध्यरात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.

शिवाय, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

पुणे पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी ३० जून रोजी पंढरपुरला देव दर्शनासाठी जात असताना वाटेत चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना लुटले होते. तसेच त्यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. दोन्ही आरोपींना बारामती सेशल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे-सोलापूर महामार्गावरून ३० जून रोजी सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास चारचाकी वाहनाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. पहाटे चारच्या सुमारास दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात भाविक चहा पिण्यासाठी थांबले. चहा घेतल्यानंतर सर्वजण पुन्हा कारमध्ये बसत होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी दुचाकीवर आले. त्यांनी काही कळायच्या आत दोघांनी सोबत आणलेली मिरचीपूड एका महिलेच्या तोंडावर फेकली.

आरोपींनी महिल्याच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने ओरबडून घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. नराधमांनी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरपटत टपरी शेजारी असलेल्या नाल्याजवळील झाडीत नेले. याठिकाणी दोघांनीही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड; पैशासाठी 40 दिवसांच्या लेकराला विकलं…

पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…

पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…

पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…

The post पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka