Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला.

पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला.

पुणेः पुणे जिल्ह्यातील पौड (ता. मुळशी) येथील विठ्ठलवाडी फाटा (ओंबळेवाडा) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला पाठलाग करून पकडले. मात्र, चोराचा पाठलाग करताना धावपळ झाल्यामुळे हृदयविकाराने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अक्षय अंकुश ओबळे (वय २७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी फाटा येथे राजेंद्र ओंबळे हे मंगळवारी रात्री झोपले होते. त्यांना घराच्या मागील बाजूच्या दरवाजातून कोणीतरी आत आल्याचा आवाज आला. ओंबळे यांनी आजूबाजूला राहणाऱ्यांना या घटनेची माहिती फोनवरून दिली. सर्व जणांनी या चोरी करणाऱ्याला गाठले. यातील तीनजण एका दिशेला पळून गेले तर एक शरद काळे नावाचा आरोपी दुसऱ्या बाजूला पळाला. दुसऱ्या बाजूला पळालेल्या शरद याचा नागरिकांनी पाठलाग केला असता तो नागरिकांच्या तावडीत सापडला. यावेळी चिडलेल्या नागरिकांनी त्याला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात केले.

आरोपी शरद काळे याचा पाठलाग करणाऱ्यांमध्ये अक्षय ओंबळे याचाही समावेश होता. पळाल्यामुळे दमछाक होऊन अक्षयला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…

विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी केली शिताफीतीने अटक…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

The post पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka