Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! MIT Collage परिसरात आढळला मृतदेह; आत्महत्या की हत्या.

पुणे! MIT Collage परिसरात आढळला मृतदेह; आत्महत्या की हत्या.

पुणे : पुण्यातील लोणी परिसरातील प्रसिद्ध एमआयटी (MIT) कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.

सुभाष कामठे (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते 'पुणे गणपती' पुस्तकाचे प्रकाशन!

सुभाष कामठे मूळचे फुरसुंगी परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती असून ते गेल्या 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. तसेच, कामठे यांना दारूचे देखील व्यसन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आता ही आत्महत्या आहे की हत्या? असा सवाल विचारला जात आहे. एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष कामठे हे शेतकरी असून कुटुंबासोबत फुरसुंगी परिसरात राहतात. कामठे हे मागील काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते, अशी तक्रार कामठे यांच्या नातेवाईकांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मच्छीमारांना एमआयटी कॉलेजच्या परिसारातील मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावर सापडला. सुभाष कामठेच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

पुणे! युवकाने बुधवार पेठेत जाऊन वेश्यागमन केले अन् पासवर्डच विसरला…

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ…

The post पुणे! MIT Collage परिसरात आढळला मृतदेह; आत्महत्या की हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka