Dailyhunt
पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार

पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर काहीच दिवसांत पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले.

शहरात सलग दोन दिवस वाहनतोडीची प्रकरणं समोर आली. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हे सगळं रोखण्यासाठी वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे मॅपिंग करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. यामुळे वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही.

पुणे शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना बंद झाल्या पाहिजेत, अशा आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कमला नेहरू रुग्णालयात पत्रकाराच्या वाहनाचे जाणून-बुजून नुकसान करण्यात आले आहे. शिवाय, येरवडा, मुंढवा यासह काही भागात मागील काही दिवसात वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. यात परिसरात दहशत माजवण्याचे प्रकार सुरु आहे. अल्पवयीन मुलांपासून मोठ्या टोळ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या कारणाने पुण्यात दहशत पसरवाताना दिसत आहे. नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जात आहे. त्यासोबतच गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

पुणे शहरातील विविध परिसरात अजूनही ड्रग्स तस्कर मोकाट फिरत आहेत. या सगळ्यांवर नजर ठेवा. ड्रग्स तस्करांची माहिती काढून कारवाई करा, असे आदेशही पोलिस आयुक्त अमितेश कुमार दिले आहेत. पुण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्स विक्रीवर पोलिसांची करडी नजर दिसत आहे. त्यातच पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांत 4000 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. यात मोठं रॅकेट समोर आले आहे. त्यामुळे शहरात अजून अनेक ठिकाणी ड्रग्स विक्री सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे शहरात रिक्षांचे टायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी केले गजाआड…

पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…

The post पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka