पुणे : पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. स्वरुप जाधव असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील स्वारगेट येथील पोलिस लाईनमध्ये स्वरुप जाधव हे राहत होते. राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस तपास करत आहेत. मूळचे कोल्हापूरचे राहणारे असणारे स्वरुप जाधव हे पोलिस शिपाई म्हणून पोलिस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते. घरातील हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने आज दुपारी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट मिळून आलेली नाही. स्वरुप जाधव यांचा मोबाईल पोलिसांना मिळाला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुले पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…
पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…
The post पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

