पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठीकारवाई केली आहे. पोलिसांच्या परिमंडळ 1 अंतर्गत एका दिवसात तब्बल 43 गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
या मोहिमेचा उद्देश नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते 'पुणे गणपती' पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे शहरातील गुंडांच्या टोळ्यांच्या गेल्या काही दिवसांपासून हालचाली वाढल्या असून, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नानापेठ भागात झालेल्या कोमकर-आंदेकर गँगच्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती.
परिमंडळ 1 चे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली. या पथकाने मात्र 24 तासांत 43 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनेकजण हे शहरातील कुख्यात आंदेकर गँगचे सदस्य असून, काहींवर खून, हत्या प्रयास (कलम 307), दारूबंदी कायदा, शस्त्रबंदी कायदा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवरात्रीच्या काळात कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख रोखण्यासाठी, विशेषतः टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…
The post पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

