Dailyhunt
पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड.

पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड.

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांनी डोकं वर काढले असून, वेगवेगळ्या गँग, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसही अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी ‘गुडघ्यावर’ आणलं आणि त्यांची धिंड काढली होती.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते 'पुणे गणपती' पुस्तकाचे प्रकाशन!

पुणे शहरातील नानापेठ भागात झालेल्या कोमकर-आंदेकर गँगच्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडीचा प्रकार झाला होता. तसेच काही मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सुद्धा हैदोस घातला होता. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडून त्यांची “वरात” काढली. पुण्यातील हडपसर भागात ठिकाणी या आरोपींनी दहशत निर्माण होईल असे कृत्य केले तिथून या आरोपींचा गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड हडपसर पोलिसांनी काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुण्यातील परिमंडळ 1चे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने गेल्याच आठवड्यात मोठी कारवाई केली होती. या पथकाने 24 तासांत 43 सराईत गुन्हेगारांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनेकजण हे शहरातील कुख्यात आंदेकर गँगचे सदस्य असून, काहींवर खून, हत्या प्रयास (कलम 307), दारूबंदी कायदा, शस्त्रबंदी कायदा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवरात्रीच्या काळात कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर…

पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…

The post पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka