Dailyhunt
पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये.

पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये.

पुणे: एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करण्यात आल्यानंतर ती सज्ञान असल्याचे भासवण्यासाठी नागपूर महापालिकेचा बनावट जन्म दाखला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी एका युवकासह पीडितेच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपी युवकाचे (वय २५) एका अल्पवयीन मुलीशी (वय १५) प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली. मुलीची प्रसूती ससून रुग्णालयात करण्यात आली. मात्र, ही मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यास कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने आरोपीने आणि मुलीच्या आईने एक कट रचला.

मुलीची प्रसूती झाल्यानंतर पोलिसांना आणि डॉक्टरांना संशय येऊ नये, म्हणून आरोपींनी नागपूर महानगरपालिकेच्या नावे एक बनावट जन्म दाखला तयार केला. या दाखल्यात मुलीचे वय ती सज्ञान (१८ वर्षांवरील) असल्याचे दाखवण्यात आले होते. हाच बनावट पुरावा त्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना आणि पोलिसांना सादर केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि कागदपत्रांच्या पडताळणीत हा दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस आणि डॉक्टरांची फसवणूक करून अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण लपवल्याप्रकरणी आता आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणुकीच्या कलमांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! महिलेने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावला अन्…

पुणे-नगर रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांचे साम्राज्य; पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष…

सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka