Dailyhunt
पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी.

पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी.

पुणे : पुणे हवामान विभागने पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला होता. बुधवारी (ता. २४) रात्रीपासून शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुणे शहरातील डेक्कन भागात पावसाने तीन युवकांचे बळी घेतले आहेत. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुणे शहरात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले. खडवासला धरणआतील 40 हजार क्युसेकचा विसर्गामुळे भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. पुणे शहर आणि परिसरात आजही दिवसभर पाऊस सुरू आहे. यामुळे पुण्यातील अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले. गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. पुण्यात बचावकार्यात रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

पुणे शहरातील डेक्कन भागात असलेल्या भिडे पुलाजवळ अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का लागून तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डेक्कन भागात तीन जणांचा हातगाडी हलविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ज्या हातगडीवर धंदा करायचे त्या हातगडीला पुराच्या पाण्यात वाचवताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणेः
१. अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25 राहणार पुलाच्या वाडी डेक्कन, पुणे)
2. आकाश विनायक माने (वय वर्ष 21 राहणार पूलाची वाडी डेक्कन, पुणे)
3. शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८ नेपाळी कामगार)

भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू
ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, मुळशी तहसीलमधील ताम्हिणी घाटात एका छोट्या भोजनालयावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस रस्त्यावरील ढिगारा हटविण्याचे काम करत असून, ते हटवल्यानंतर रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे लवासा परिसरातील एका बंगल्यात तीन जण चिखलात अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट
खेड, जुन्नर, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ, भोर, हवेली तालुके आणि पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहर परिसरातील ‘घाट’ (डोंगरातील खिंडी) विभागातील अतिवृष्टीचा विचार करून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीम सखल भागात तैनात करण्यात आल्या आहेतय जेथे पूर आणि पूर येण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडण्याचे आवाहन दिवसे यांनी केले. आयएमडीने पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. विनाकरण घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

पोलिसकाका Video News: २५ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…

धक्कादायक Video! मुरबाडमध्ये वायरमनचा मृत्यू CCTV मध्ये झाला कैद…

ह्रदयद्रावक! महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka