Dailyhunt
पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू.

पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू.

पुणे: पुणे शहरात कौटुंबिक वादातून पत्नीला शिव्या दिल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये वाद झाल्यानंतर भावाने दुसऱ्या भावाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना नांदेड सिटीजवळ घडली आहे.

पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडलेला गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कौटुंबिक वादातून पत्नीला शिव्या देत असल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका भावाने दुसऱ्या भावाला पाचव्या मजल्यावरून ढकलले. तो खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाला, या घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धायरीगाव परिसरातील मतेनगरमधील कपील अपार्टमेंटमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अमर किसन देशमुख (वय 34) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी राजू भुरेलाल देशमुख (रा. घायरी गाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहपत हरीराम साहारे (वय 36, रा. धायरीगाव, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. आरोपी राजू देशमुख व मृत अमर देशमुख हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरातील रहिवासी असून, कामानिमित्ताने ते पुण्यात आले होते.

धायरी परिसरामध्ये असलेल्या एका सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात ते काम करत होते. अमर देशमुख याच्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून राजू देशमुख हा शिवीगाळ करत असल्याने त्यांच्यमध्ये वाद निर्माण झाला होता. सदर भांडणात मृत व्यक्ती हा आरोपीला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावल्याने आरोपीने मृत युवकाला ढकलून दिले. अमर देशमुख हा पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी होऊन मृत झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने आरोपी राजू देशमुख याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास नांदेड सिटी पोलिस करत आहेत.

पुण्यात 15व्या मजल्यावरून उडी घेत जीव देणाऱ्या विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण समोर…

धक्कादायक! पुणे शहराजवळ अंगावर कंटेनर घालत सहकाऱ्याचा घेतला जीव…

पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…

धक्कादायक Video: पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने काय-काय केले पाहाच…

The post पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka