पुणे: पुणे शहरातील पोलिसाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलत शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतीत राहत्या घरी गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
ऋषिकेश दादा कोकणे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश कुटुंबासह शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील ई ब्लॉक इमारतीत राहत होता. त्याचे वडील दादा कोकणे राज्य राखीव पोलिस दलात (दौंड) सहाय्यक उपनिरीक्षकपदी नेमणुकीस आहेत. ऋषिकेश हा कला शाखेच्या पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचे आई-वडील शनिवारी बाहेर गेले होते. त्यावेळी त्याचे मित्र त्याला फोन करत होते. मात्र, ऋषिकेश कडून उत्तर न मिळाल्याने मित्र घरी आले. त्यांनी घराचा दरवाजा वाजवला असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी पोलिसांना संबंधित माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ऋषिकेश याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ देखील बनवला असून त्यामध्ये त्याने प्रेमभंगातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाजीनगर प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
प्रेमी युगलाने रेल्वेसमोर उडी मारून घेतला जगाचा निरोप…
पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
The post प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

