Dailyhunt
पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर.

पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर.

पुणे : पुणे शहरात हडपसर भागात खोक्यात सापडलेल्या मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. आर्थिक वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. युवकाचे हात पाय बांधून खोक्याल चिकटपट्टी लावण्यात आली होती.

पोलिसांनी तपास करुन तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले आहे.

इम्रान यासीन पटेल (वय २४, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ आसिफ मेहबुब पटेल (वय २९, रा. रॉयल मॅरेज हॉलसमोर, थेऊर फाटा, गाढवे मळा, लोणी काळभोर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निजामुद्दीन पटेल (वय ३०, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली.

हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक खोके नागरिकांनी पाहिले. खोके बंद करून ते कालव्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले होते. खोके उघडल्याानंतर युवकाचा मृतदेह सापडला होता. तरुणाचे हात पाय बांधण्यात आले होते. खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. युवकाची ओळख पटलेली नव्हती. पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला. शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणांची माहिती घेण्यात आली. कोंढवा परिसरातून इम्रान पटेल बेपत्ता झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पटेलच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा इम्रानच्या खूनापूर्वी आदल्या दिवशी सायंकाळी निजामुद्दीनने त्याला बोलावून घेतले होते. आर्थिक वादातून निजामुद्दीनने इम्रानच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. या घटनेत इम्रानचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर निजामुद्दीनने त्याचे हात पाय दोरीने बांधले. एका खोक्यात मृतदेह ठेवला. हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोके टाकून तो पसार झाला. तपासात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.

आरोपी निजामुद्दीन आणि इम्रान यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाले होते. आरेपीने त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यसाठी हात पाय बांधून खोक्यात भरला. दुचाकीवरुन खोके आणून त्याने हिंगणे मळा परिसरात टाकून दिला. खून प्रकरणात आणखी कोण सामील आहे का?, यादृष्टीने तपास सुरु असल्याचे परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, समीर पांडुळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ यांनी ही कामगिरी केली असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात बॉक्समध्ये सापडला युवकाचा मृतदेह…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…

पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…

पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…

प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…

बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस केले जेरबंद…

The post पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka