पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर येरवडा परिसरात पहाटे दोघांवर गोळीबार झाला.
येरवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांमध्ये गोळीबार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. आज (शुक्रवार) पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास येरवड्यातील अग्रसेन स्कूलसमोर ही घटना घडली. जुना भांडणाचा वाद होता दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे.
पुणे शहरात गेल्या 3 दिवसांत चार ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. हडपसर, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड तर आज येरवडा परिसरात गोळीबार झाला. सिंहगड रोडवर गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता गोळीबार झाला. भूमकर चौकात गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गणेश गायकवाड यांच्या खांद्याला गोळी लागली आहे.
दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गुन्हेगारांची परेड घेण्यात आली आहे. कोयता गँग, ड्रग्ज प्रकरण यानंतर गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे सातत्याने चर्चेत येत आहे.
पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार…
पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार…
पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…
पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

