पुणे : पुणे शहरात कोयता गँगने सहाय्यक पोलिस निरिक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक आज (रविवार) दुपारी साडेचारच्या सुमारास घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे शहरातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या रत्नदीप गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निहाल सिंग नावाच्या आरोपीने एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला. निहाल सिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने याआधीही पोलिसांवर हल्ले केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्यावेळी दुसरा आरोपी राहुल सिंगही तिथे होता, तोही रेकॉडवरील आरोपी आहे. या दोघांकडे यापूर्वी अवैध पिस्तुल देखील आढळून आले होते.
दरम्यान, दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू असताना एपीआय गायकवाड आरोपींना पकडायला गेले असताना ही घटना घडली आहे. यापूर्वीही पुण्यात कोयता गँगने मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची शहरातून धिंडही काढली होती. पण आता कोयता गँगने थेट पोलिसांवरच हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…
Video: 'खैके पान बनारस वाला' या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
The post पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

