Dailyhunt
पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक.

पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक.

पुणे: पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका डॉक्टर युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहिले लग्न झालेले असतानाही लग्न जमविणाऱ्या एका साईटवर अविवाहित असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून युवतीकडून 10 लाख रुपये घेत नकार दिला.

हा मानसिक धक्का पचवू न शकलेल्या डॉक्टर युवतीने विषारी औषध घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीला अटक केली आहे.

पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. कुलदीप आदिनाथ सावंत असे आरोपी युवकाचे नाव आहे. आरोपी कुलदीप याने विवाहित असूनही एका मेट्रीमोनियल साइटवर रजिस्ट्रेशन केले होते. याच वेबसाईटच्या माध्यमातून त्याने पीडितेशी संपर्क साधला होता. तसेच आपण लग्नासाठी इच्छुक असल्याचे आरोपीने पीडितेला सांगितले होते.

पीडित महिला डॉक्टरने आरोपीसोबत लग्न करण्यास सुरवातीला नकार दिला. मात्र, आरोपीने पीडितेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. ज्यावेळी तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच आपण विवाहित असून पत्नी गर्भवती असल्याचे आरोपीने पीडितेला सांगितले. युवतीला हे समजल्यानंतर मोठा मानसिक धक्का बसला. एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडितेकडून घेतलेले दहा लाख रुपये परत देण्यास देखील टाळाटाळ केली.

नैराश्य आल्यानंतर पीडित डॉक्टर युवतीने क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आता पीडित तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

लखोबा लोखंडे! पुणे शहरातील एकाने 25 हून अधिक महिलांची केली फसवणूक अन्…

लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

The post पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka