पुणे : पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर दोन जणांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्या उर्फ विष्णू लक्ष्मण होसमणी (वय 23, रा. इंदिरानगर, खडडा, गुलटेकडी) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. तर भिमराव नरसप्पा मानपाढे (वय 26, रा. गुलाबनगर, धनकवडी, पुणे-37) आणि लखन वाघमारे (वय 30, रा. अप्पर बिबवेवाडी, पुणे-37) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मानपाढे आणि वाघमारे यांनी कारमधून येत विष्णूवर हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षभरापूर्वी घडलेल्या एका गुन्ह्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. त्यावेळी आरोपी मानपाढे आणि वाघमारे यांनी पीडित होसमणी याला लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी होसमणी याने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दोन्ही आरोपींना तुरुंगवारी घडली होती. अलीकडेच त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर येताच आरोपींनी पुन्हा एकदा होसमणी याच्यावर हल्ला केला.
"तू आमची तक्रार केली , तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं," असे म्हणत आरोपींनी कोयत्याने वार केले आहेत. घटनेच्या वेळी फिर्यादी आणि त्याचा मित्र स्वारगेट परिसरात एकेठिकाणी थांबले होते. यावेळी दोन्ही आरोपी चारचाकी गाडीतून तिथे आले. फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुक्की करायला सुरुवात केली. फिर्यादीने विरोध करताच दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पीडिताचा मित्र कृष्णा विजय सोनकांबळे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्यालाही मारहाण केली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका…
पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू…
पुणे! सारसबागेत दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी…
पुणे! प्रेयसीचा वाढदिवस लॉजवर साजरा केला अन् केली निर्घृण हत्या…
पुणे! दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पोलिसांनी उतरवला माज…
Loading…
The post पुणे! तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं, थेट कोयत्याने वार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

