Dailyhunt
पुण्यात आलेल्या विद्यार्थ्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवलं.

पुण्यात आलेल्या विद्यार्थ्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवलं.

पुणे: पुणे शहरात नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने महिला पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. पुणे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर अज्ञात चार चाकी वाहनचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली.

दिल्लीहून पुण्याला मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्याने दारूच्या नशेत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवण्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. नाकाबंदीसाठी असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवत दहा ते वीस मीटर पर्यंत एका चार चाकी वाहनाने फरपटत नेले. या अपघातात ती महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाली आहे. याच प्रकरणात या कार चालकाला गाडीसह पुणे पोलिसांनी अटक केली असून अर्णव सिंघल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अपघाताच्या दिवशी या आरोपीसोबत त्याचे आणखीन तीन ते चार मित्र गाडीत होते. अर्णव हा दिल्लीवरून खास त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आला होता आणि कोरेगाव पार्कमध्ये बर्थडे पार्टी करून दारूच्या नशेत त्याने कार चालवली आणि नाकाबंदीसाठी उभा असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवले. याच प्रकरणी अर्णवला आता अटक झाली असून, त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी सांगितले की, ‘आरोपी पुण्यात फिरण्यासाठी आला होता. तो आणि त्याचे काही मित्र गाडीतून येत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्यावेळी गाडी न थांबवता ट्रिपल बॅरिकेटला धडकून ते गेले आणि त्यावेळी तिथे उभे असणाऱ्या एका पोलिस महिला कर्मचारी यांना धडक दिली. त्या गाडीसोबत पन्नास ते साठ मीटर फरपटत गेल्या. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर गाडी न थांबवता आरोपी तसाच पुढे निघून गेला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. गाडीचा वेग भरधाव होता.’

कोरेगाव पार्कच्या हद्दीमध्ये दुसऱ्या दिवशी खाजगी सीसीटीव्हीच्या मदतीने, सोसायटीच्या सीसीटीव्हीने, त्याचबरोबर हॉटेलच्या सीसीटीव्हीने, चेक करण्यात आला. त्यानंतर त्या गाडीचा नंबर समजला गाडीचा नंबर मिळाल्यानंतर त्यावरून गाडीचा मालक कोण आहे. याची माहिती काढण्यात आली. त्यावेळी समजले ही कार झूम कार वरून भाड्याने घेण्यात आली होती. यादरम्यान ही कार कोणाला भाड्याने दिली होती त्याची माहिती काढण्यात आली. संबंधित आरोपी हा खडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापडला. तो आणि त्याचा मित्र दिल्लीवरून पुण्यात आले होते. त्यांचे इतर दोन मित्र पुण्यात होते. असे चौघेजण त्यादिवशी रात्री कोरेगाव पार्कमध्ये गेले होते आणि परत येताना त्यांच्याकडून हा अपघात झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला…

ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह! पुणे शहरात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाने दोघांना उडवले…

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…

पुणे शहरात 'रात्रीस खेळ चाले'; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

The post पुण्यात आलेल्या विद्यार्थ्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka