Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने.

धाराशिव: भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या एका पैलवानाने श्रीमुखात लगावल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. निलेश घायवळ ही कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. त्यावेळी एक पैलवान अचानक निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला. या पैलवानाने निलेश घायवळ याला धक्काबुक्की करतानाच श्रीमुखात लगावली. मात्र, आजुबाजूचे लोक लगेच निलेश घायवळच्या मदतीला धावून आले. घायवळ समर्थकांनी या पैलवानाला चोप दिला आहे. हल्ला करणारा पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याची माहिती पुढे आली आहे.

निलेश घायवळ याच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, अशाप्रकारे एका कुख्यात गुंडावर भरमैदानात हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, व्हिडीओत निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवल्या जात आहे. हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक चालताना दिसत आहे. हे सर्वजण कुस्तीच्या फडात पहिलवानांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी समोरच उभ्या असलेला पैलवान निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला. या पैलावानाने निलेश घायवळच्या कानाखाली मारली. त्यानंतर हा पैलवान निलेश घायवळला आणखी मारहाण करण्याच्या बेतात होता. मात्र, घायवळ गँगमधील सहकारी या पैलवानावर तुटून पडले. त्यांनी या पैलवानाला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे कु्स्ती स्पर्धेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, गुन्हेगार निलेश घायवळ याच्यावर यापूर्वी मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.

कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…

पुणे शहरातील कुख्यात गुंडाची मिरवणूक; आता बाप बाहेर आलाय…

कुख्यात गँगस्टर अरुण गवळी कारागृहातून येणार कायमचा बाहेर…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka