Dailyhunt
कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर.

कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर.

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे.

देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे देखील आरोपी आहे. देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे हा कोथरूड पोलिस स्टेशनला हजर झाला असून, पोलिसांनी गजा मारणे याला फरशीवर खाली बसवले आहे.

देवेंद्र जोग हे शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी (ता. १९) दुपारी कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी गजानन मारणे टोळीतील बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी गाडीचा धक्का लागला, असे म्हणत जोग यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: जोग यांची भेट घेतली अन् विचारपूस केली होती. या प्रकरणात पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी बाबू पवार हा फरार झाला आहे. बाबू पवार हा गजा मारणे याचा भाचा आहे. त्यामुळे आता मामा भाचे अडचणीत सापडले आहेत.

केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलिस आयुक्ता यांच्यावर नाराजी दर्शवत गंभीर टीका केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. अखेर, गजा मारणे याला पोलिस स्टेशनला हजर व्हावे लागले. पोलिसांनी गजा मारणेला इतर गुन्हेगाराप्रमाणे फरशीवर खाली बसवले. गुन्हे दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, पुणे पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का? तरुण पिढीने यातून काय घ्यायचं? माझ्या पुण्याचे नाव खराब व्हायला नको. लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी विचारला होता. सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, अशा शब्दात मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सुचना दिल्या होत्या.

गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण…

भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात…

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मामा भाच्याला अटक…

पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू…

The post कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka