Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस.

पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस.

पुणेः राज्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराच्या अनेक संतापजन घटना समोर येत आहेत. बदलापूर त्यानंतर, मुंबई, पुणे, अकोला, दौंड त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे.

पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे.

शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला ‘तू मला आवडतेस’ असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असे म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित स्कूल व्हॅन चालकावर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चांगलात चोप दिला. त्यानंतर मनसैनिकांनी स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी युवक हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka