गुवाहाटी (आसाम): एका युवतीने तिच्या मित्राच्या साथीने हॉटेलच्या रूममध्ये पुणे शहरातील व्यावसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप कांबळी (वय 42, रा. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
आसाम पोलिसांनी अंजली शॉ व तिचा प्रियकर विकास शॉ यांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. मृत संदीपच्या फोनमध्ये अंजली आणि त्याचे इंटिमेट फोटो होते. या फोटोजवरून अंजली, विकास आणि संदीपमध्ये भांडण झाले होते. अंजली व विकासने संदीपच्या फोनमधून ते फोटो डिलीट करण्यासाठी प्लॅन केला. त्यानुसार अंजलीने संदीपला फोन करून 4 फेब्रुवारी 2024 रोजी गुवाहाटीला बोलावले होते. तेथे त्याच्यासाठी हॉटेलची रूमही बुक केली होती. त्याच हॉटेलमध्ये विकासने स्वतःसाठी वेगळी रूम बुक केली होती.
संदीप हॉटेलवर पोहोचल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास विकास आणि अंजली त्याच्या रूममध्ये गेले. त्यानंतर विकासने संदीपचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत संदीपला गंभीर दुखापत झाली व तो बेशुद्ध पडला. त्यानंतर घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फूटेज तपासले. अंजली व विकास दोघेही रात्री सव्वानऊच्या विमानाने कोलकाता येथे पळून जाणार होते. त्यानुसार ते दोघे सायंकाळी साडेसहा वाजता विमानतळाकडे निघालेले होते; पण त्याच वेळी आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मृत संदीप हा पुण्यातला कार डीलर होता. आरोपी अंजलीशी तो रिलेशनशिपमध्ये होता. अंजली कोलकाता विमानतळावर एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती व ती विकास नावाच्या व्यक्तीसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. अंजलीशी असलेली रिलेशनशिप संपल्यानंतरही संदीप तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. त्यातूनच वाद होऊन अंजलीने विकासच्या मदतीने संदीपचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…
धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे…
एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…
प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…
The post पुण्यातील व्यावसायिकाची प्रेम प्रकरणातून गुवाहाटीत हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

