Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील युवतीची बंगळुरूमध्ये नवऱ्याने केली क्रूरपणे हत्या अन् केला फोन.

पुण्यातील युवतीची बंगळुरूमध्ये नवऱ्याने केली क्रूरपणे हत्या अन् केला फोन.

पुणे: एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता.

आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गौरी खेडेकर असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तिचा दोन वर्षांपूर्वी आरोपी राकेश राजेंद्र खेडेकर याच्याशी विवाह झाला होता. महिनापूर्वी दोघंही बंगळुरूला शिफ्ट झाले होते. मात्र, महिनाभरात आरोपी राकेश याने पत्नीचा बुधवारी रात्री खून केला आहे.

आरोपी राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ कारणातून अनेकदा वाद होत होते. बुधवारी रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी गौरीने आधी राकेशला मारले. यानंतर संतापलेल्या राकेश याने किचनमधील चाकू घेऊन गौरीवर हल्ला केला. त्याने तीन वार करत गौरीला रक्ताच्या थारोळात पाडले. यानंतर तिचा गळा चिरला. हत्येनंतर आरोपीने गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि ही सुटकेस घरातील बाथरुममध्ये नेऊन ठेवली. हत्येनंतर आरोपी राहत्या घरातून फरार झाला.

बंगळुरू सोडल्यानंतर त्याने घरमालक आणि सासरच्यांना फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. यानंतर घरमालकाने गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांना फोन करून ही माहिती दिली, यानंतर हे प्रकरण उजेडात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बंगलोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

आरोपी पती हा एका आयटी कंपनीत काम करत होता. मृत गौरीने मास मीडियाचे शिक्षण घेतले होते. ती नोकरीच्या शोधात होती. नवऱ्याचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे दोघंही घरीच होते. त्यामुळे त्यांच्यात वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अद्याप अधिकृत कारण सांगितले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले…

पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…

पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…

अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…

धक्कादायक! झोपेत असताना पती, पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या..

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka