Dailyhunt
अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्.

अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्.

खनौ (उत्तर प्रदेश) : कानपूरमध्ये व्यावसायिकाच्या पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पुरून ठेवला होता. पोलिसांनी चार महिन्यानंतर या खूनाचा छडा लावला असून, आरोपी विमल सोनी याला अटक केली आहे.

विमल सोनी हा जिम ट्रेनर असून तो मिस्टर कानपूर आणि मिस्टर यूपी स्पर्धाही जिंकला आहे.

व्यावसायिकाची पत्नी एकता गुप्ता यांची ४ महिन्यापूर्वी हत्या केल्यानंतर जिम ट्रेनर विमल याने त्याचे सोशल मीडिया अकाउंट बंद केले होते. जिम ट्रेनिंगवेळी ट्रेनर विमल सोनी आणि विवाहित असलेल्या एकता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर विमलने तपासावेळी सांगितलं की, एकता त्याच्या प्रेमात पडली होती. एकता माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मला दुसऱ्या कोणाशी लग्न करून देत नव्हती. यामुळे तिचा खून केला. विमल सोनी याने एकता गुप्ताचा ग्रीन पार्कच्या स्टेडियममध्ये पार्किंगमध्ये उभा असलेल्या गाडीतच हत्या केली. हत्या करण्यापूर्वी नशेची गोळी दिली होती. यामुळे एकता बेशुद्ध झाली आणि दोरीने गळा आवळला. त्यानंतर मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारात नेऊन गाडला. पण, पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे.

विमल सोनीने पोलिसांना सांगितले की, ‘२०१०च्या आधी मिस्टर कानपूर बॉडी बिल्डर पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर मिस्टर यूपी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २०१० मध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेतही भाग घेतला. पण पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यानंतर कानपूरला एका हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. कानपूरमध्ये माजी जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये यश मिळवल्याचे समजले तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी बंगल्याच्या बाजूला असलेल्या ऑफिसर्स क्लबमध्ये जिम ट्रेनर म्हणून नोकरी लावली. पण काही काळाने अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याने त्याला हटवले होते. यावेळी पुन्हा एकदा एका आयएएस अधिकाऱ्याचे नाव सांगत त्याने ग्रीन पार्कमध्ये नोकरी मिळवली.’

Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…

धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने घेतला जगाचा निरोप…

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…

The post अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka