Dailyhunt
सासवड जवळ असलेल्या मल्हारगड किल्ल्यावर जोडप्याचे अश्लिल चाळे अन्.

सासवड जवळ असलेल्या मल्हारगड किल्ल्यावर जोडप्याचे अश्लिल चाळे अन्.

पुणे : पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ असलेल्या मल्हारगडावर अश्लिल चाळे करताना हटकल्याने राग अनावर झाल्याने जोडप्याने दुर्गप्रेमीच्या डोक्यात दगड घातला आणि रक्तबंबाळ झाल्यावर गळा दाबला.

प्रमोद जगताप असे दुर्गप्रेमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सासवडमधील रुग्णालयात अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दुर्गप्रेमीने जोडप्याचे मल्हारगडावर अश्लिल चाळे करतानाचे व्हिडिओ काढून हटकल्याच्या रागातून मारहाण झाल्याचे पीडित युवकाने म्हटले आहे. प्रमोद जगताप हा दररोज मल्हारगडावर जात असून, तिथे त्याला एक जोडपे अश्लिल चाळे करताना नजरेस पडले. पहिल्यांदा सांगूनही जोडप्याने ऐकले नाही. त्यानंतर प्रमोदने व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरवात केली. मात्र, जोडपं ऐकायला तयार नव्हते. अखेर माझ्याकडे तुमची शूटिंग आहे, गपगुमाने इथून जा, असे प्रमोदने सांगितले. त्यावर मात्र चिडलेल्या जोडप्याने प्रमोदवर हल्ला चढवला. दोघांनी मिळून प्रमोदच्या डोक्यात दगड घातले तर त्याचा गळाही दाबला, असे एफआयआरमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात तपास सुरू केला असून जोडप्याला लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…

पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…

धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे अन् पोलिसांची कारवाई…

धक्कादायक! मित्रांसोबत मस्करी करणे बेतले महिलेच्या जीवावर…

प्रियकराचा मित्र युवतीला शारीरिक संबंधाचे व्हिडीओ असल्याचे म्हणाला अन्…

The post सासवड जवळ असलेल्या मल्हारगड किल्ल्यावर जोडप्याचे अश्लिल चाळे अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka