सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवथर येथे अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरामध्ये भर दुपारी घुसून गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा प्रथमेश जाधव (वय 25) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पूजा यांचा 2017 साली गावातीलच प्रथमेश जाधव नावाच्या युवकासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना 7 वर्षाचा मुलगा आहे. पूजा यांच्या खुनाची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. विवाहितेची हत्या का झाली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच संशयित देखील अज्ञात आहे. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर साताऱ्याचे डीवायएसपी राजीव नवले आणि पोलीस अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शिवविच्छेदनासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
पूजा जाधव यांचे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शिवथर-मालगाव रस्त्यालगत घर आहे. घरात सासू, सासरे, पती प्रथमेश आणि मुलगा यश राहत होते. प्रथमेशचा भाऊ सागर जाधव हा कामानिमित्त पुण्यात राहतो. सोमवारी पती हा मुलाला शाळेत सोडून कामावर गेला होता, तर सासू-सासरे शेतात गेले होते. घराचे सर्व दरवाजे उघडे असल्याने शेजारी राहणारी एक आजी त्यांच्या घरात गेली असताना हत्येची घटना उघडकीस आली. महिलेच्या हत्येची घटना समोर आल्यानंतर शेजाऱ्यांनी शेतामध्ये कामाला गेलेल्या सासू-सासऱ्यांसह पतीला बोलावून घेतले. सुनेचा मृतदेह पाहून सासू सासऱ्यांना धक्का बसला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
विवाहित महिलेची गळा चिरून हत्या झाल्याच्या खळबळजनक घटनेनंतर साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर, डीवायएसपी राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोर्डे, नेवसे, उपनिरीक्षक गुरव, शिंदे, महसूल अधिकारी विशाल पवार, माजी पोलीस पाटील भारत पाटील यांच्यासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस लवकरच हत्त्येचा गुन्हा उघडकीस आणतील, असा विश्वास पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी व्यक्त केला आहे.
पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
जीवन संपवलं! 'वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…
सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…
सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…
सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…
The post सातारा हादरला! घरामध्ये घुसून विवाहित महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

