Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई.

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई.

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी एक दणकेबाज कारवाई केली आहे. 48 किलो गांजासह सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन जणांना जेरबंद केले आहे.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

सत्यसाई कार्तीक यांना 11/07/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे 11/07/2024 रोजी पहाटे 03.05 वाजताच्या सुमारास जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस धाब्याचे समोर एक संशयित वाहन थांबल्याने कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये चारचाकी वाहनाचे डिक्किमधील दोन पोत्यांमध्ये रू.9,20,000/-(अक्षरी नऊ लाख वीस हजार रु.) किमतीचा 48 किलो गांजा मिळून आला. सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. सदरच्या कारवाई मध्ये
1)नितीन शिवाजी लेहने, वय 38 वर्ष, रा. औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड,
2) संदिपान पाटलोबा गुट्टे, वय 39 वर्ष, राहणार परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड,
3) गणेश सुरेश दराडे, वय 30 वर्ष, राहणार केज, तालुका केज, जिल्हा बीड यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन लोणावळा ग्रामीण पो.स्टे येथे आणून सदरबाबत पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. गु र.न. 223/2024 एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) (क), 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत.

संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील कारवाईमध्ये 48 किलो गंजासह एकूण रु.14,60,000 /- (अक्षरी – चौदा लाख साठ हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिस यंत्रणा सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ महेश थोरात यांचे पथकाने केली आहे.

Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते

Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले अन्…

लोणावळा पोलिसांनी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka