भोपाळ (मध्य प्रदेश): सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने हाताची नस कापली आणि नंतर स्वत: चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुषार शुक्ला असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांना DGP च्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तातडीने त्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे. तुषार हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. त्याच्यावर उपचार चालू होते. यापूर्वी देखील त्याने अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन ब्लेड जप्त केले आहे. या प्रकरणी अजून चौकशी सुरू आहे.
तुषार नेमका कसा तणावात गेला, यामागे नेमकं काय कारण होतं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तुषार शुक्ला छत्तीसगडचे पहिले डीजीपी मोहन शुक्ला यांचा मुलगा होता. रिटायर्डमेंटनंतर मोहन शुल्का आपल्या कुटुंबासोबत भोपाळमध्ये राहात होते. मुलाच्या जाण्याचा धक्का कुटुंबियांना बसला आहे.
पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…
IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह…
IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
The post सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

