वाशिम : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून, अपघातात सहा जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात असल्याची माहिती पुढे आली आहे. वाशिमवरून अकोलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडी आमने-सामने आल्याने जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले) यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आसटूल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मृत शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले आणि अधिक काही जणांसह काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना अकोला येथे उपचार्थ हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू…
भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…
लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले अन् अपघाताने गाठले; सहा जागीच ठार…
The post शिक्षक आमदारच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

