Dailyhunt
लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले अन् अपघाताने गाठले; सहा जागीच ठार.

लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले अन् अपघाताने गाठले; सहा जागीच ठार.

वाराणसी (उत्तर प्रदेश): लग्नासाठी मुलगी बघायला निघाले असताना मोटारीला झालेल्या अपघातात मुलासह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. या घटनेमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे हा अपघात झाला आहे. मोटार आजमगढहून जौनपूरला निघाली होती. तर ट्रक जौनपूरहून केराकतकडे निघाला होता. दोन्हींची धडक होऊन हा अपघात झाला. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात कुटुंबातील ६ जण ठार झाले. यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी जौनपूहून वाराणसीला पाठवण्यात आले आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला तर ट्रक रस्त्याकडेला पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. इतर ६ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिघांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले.

कारमधील कुटुंबिय लग्नासाठी मुलगी बघायला निघाले होते. यात अनिश गजाधर शर्मा, गजाधर लक्ष्मण शर्मा, जवाहर रामप्रताप शर्मा, गौतम जवाहर शर्मा, सोनम बजरंग शर्मा, रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण बिहारच्या सीतामढी येथे राहत होते. बिहारकडून प्रयागराजच्या दिशेने ते जात असताना कारचा अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक आणि इतर दोघे फरार झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाला आहे. ट्रक चालकाचा शोध घेतला जात असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…

नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…

कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…

अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री

The post लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले अन् अपघाताने गाठले; सहा जागीच ठार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka