Dailyhunt
विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा.

विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा.

न्यूयॉर्क: विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी मेरीलँड येथील एका माजी शिक्षिकेला न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मेलिसा कर्टिस असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

मेलिसावर अल्पवयीन विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाचा आरोप होता.

फॉक्स 5 डीसी अहवालानुसार, लैंगिक शोषण प्रकरणातील तीन गुन्ह्यांसाठी मेलिसा कर्टिसला 30 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय 12 महिन्यांची शिक्षा निलंबित केली जाईल आणि पाच वर्षांची नजरकैदेची शिक्षा होईल. कारागृहातून सुटका झाल्यानंतर, कर्टिसला 25 वर्षांसाठी लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंदणी करावी लागेल. तसेच स्वतःच्या मुलांशिवाय इतर कोणत्याही अल्पवयीन मुलांसोबत मेलिसाला संपर्क ठेवण्याची परवानगी मिळणार नाही. आरोपी शिक्षिकेने 7 नोव्हेंबर 2023 रोजी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते.

कर्टिसने आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दारू प्यायला दिली आणि त्याच्यासोबत कधी कारमध्ये तर कधी मॉन्टगोमेरी काउंटीमधील वेगवेगळ्या घरांमध्ये 20 पेक्षा जास्त वेळा सेक्स केला. कर्टिस सुमारे दोन वर्षे शिक्षिका म्हणून लेकलँड्स पार्क मिडल स्कूलमध्ये काम करत होती. शाळेनंतरच्या कार्यक्रमात शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होती, असा आरोप आहे.

पुणे शहरात वर्गातच विद्यार्थ्याने चिरला काचेच्या तुकड्याने गळा…

हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…

शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ठेवले शारीरिक संबंध अन् घडली अद्दल…

The post विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka