Dailyhunt
शिवसेनेचे अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

शिवसेनेचे अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

पालघर: शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे गेल्या अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत. अशोक धोडी यांच्या अपहरणप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या आरोपींचा सहभाग असल्याचा खुलासा पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. अटक आणि फरार आरोपींविरोधात घोलवड पोलिस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यातील आरोपी अटक झाल्यानंतर पुढील माहिती प्राप्त होईल, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

अशोक धोडी यांनी 20 जानेवारीला पत्नीला फोन केला होता. आपण डहाणूवरून घरी येत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. तेव्हापासून अशोक धोडी यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. पाच ते सहा आरोपींनी धोडी यांचं अपहरण केल्याचा संशय पोलिसांना होता. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार होते. पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. अटक केलेल्या आरोपींचा या प्रकरणात नेमका सहभाग काय आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण! आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

The post शिवसेनेचे अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka